नाशिक : संदीप कऱ्हे शहर पोलिस दलात कार्यरत असून, ते आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. पण भामट्याच्या जाळ्यात अडकून त्यांना चांगलाच गंडा घातला आहे.
पोलिसाला ऑनलाइन गंडा
संदीप कऱ्हे शहर पोलिस दलात कार्यरत असून, ते आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. २८ जानेवारीला सायंकाळी भामट्याने (८३०३७९३०४६) या क्रमांकावरून संपर्क साधून कार्डचे लिमिट वाढविण्याबाबत विचारपूस केली. कऱ्हे यांनी क्रेडिट वाढची पसंती दर्शविली असता, ही घटना घडली. कार्डची गोपनीय माहिती आणि ओटीपी नंबर मिळवून भामट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवर पासकर टेक्नॉलॉजी या कंपनीतून सुमारे ७९ हजार १४ रुपयांची खरेदी केली. ही बाब लक्षात येताच कऱ्हे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह
आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल
बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून भामट्याने क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा वाढवून देण्याची बतावणी करीत पोलिसाच्या क्रेडिट कार्डवरून ८० हजारांची परस्पर खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संदीप श्रावण कऱ्हे (रा. स्नेहबंधन पार्क, पोलिस वसाहत) यांच्या तक्रारीवरून फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी