पोलिस ठाण्याबाहेरच सिलिंडरने घेतला पेट; पोलिस कर्मचारी व नागरिकांची एकच धावपळ

नाशिक :  पोलीस स्टेशन बाहेर अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. सिलिंडरने पेट घेताच प्रवेशद्वारजवळ उभे असलेले पोलिस कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. काय घडले नेमके?

दिवसभर या घटनेची परिसरात चर्चा

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक कुटुंबीय राहते. मंगळवारी (ता.२३) सायंकाळी त्यांनी गॅस शेगडी पेटविली. अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. घटना लक्षात येतात त्या कुटुंबातील तरुणाने गोधडी पाण्यात ओली करत सिलिंडरवर फेकली. त्यामुळे आग विझली. सिलिंडरने पेट घेताच प्रवेशद्वारजवळ उभे असलेले पोलिस कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. तरुणाच्या प्रसंगावधानमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ ठळला. बुधवारी (ता. २४) दिवसभर या घटनेची परिसरात चर्चा होती.  

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

सुदैवाने कुठलीही दुर्घटना नाही

भद्रकाली पोलिस ठाण्याबाहेर प्रवेशद्वारास लागून घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेतल्याची घटना मंगळवारी (ता.२३) सायंकाळी घडली. प्रसंगावधान राखत तरुणाने पाण्याने भिजलेली गोधडी सिलिंडरवर टाकल्याने आग विझली. सुदैवाने कुठली दुर्घटना घडली नाही. पोलिसांसह परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ