पोल्ट्री शेडची जाळी कापून 21 हजार अंडी लंपास! शेतकऱ्याला 80 हजारांचा फटका 

सिन्नर (जि.नाशिक) : तालुक्यातील दुसंगवाडी (वावी) शिवारात राजेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा यांच्या ओम पोल्ट्री फार्मच्या अंडी साठवलेल्या गोडाऊनची जाळी तोडून (ता.9) रात्री बारा ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुमारे 21 हजार अंडी चोरून नेली. 700 ट्रे मध्ये ही अंडी साठवलेली होती.

शेतकऱ्याला 80 हजारांचा फटका 

सकाळी पोल्ट्री व्यवस्थापक उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. या घटनेमुळे भुतडा यांचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . सिन्नरच्या पूर्व भागात वावी, चिंचोलीगुरव, देवकौठे, कहांडळवाडी, मलढोन, दुसंगवाडी परिसरात तीनशेच्या वर पोल्ट्री धारकांनी अंडी व्यवसाय सुरू केला आहे  गेल्या आठवड्यात वावी-घोटेवाडी रस्त्यावर नवनाथ यादव यांच्या पोल्ट्री फार्म मधून देखील सातशे जाळ्या अंडी चोरीस गेले होते 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर