Site icon

प्रजासत्ताक दिन-2023 : ‘आरोग्य’चे विद्यार्थी होणार राज्यस्तरीय पथसंचलनात सहभागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिन राज्यस्तरीय पथसंचलनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन स्वयंसेवकांची निवड झाली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नाशिक येथील संलग्नित मोतीवाला होमिओपॅथिक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थिनी रितिका रहान दुबे, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी अर्णव लीलाधर वढाई व बुलढाणा येथील एएसपीएम आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी भगवान भाऊसाहेब साकुंडे यांची राज्यस्तरीय पथसंचलनासाठी निवड झाली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे 26 जानेवारी रोजी होणार्‍या पथसंचलनासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अर्णव लीलाधर वढाई याची राष्ट्रीय स्तरावरील पथसंचलनात प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, प्रति कुलगुरू डॉ. मिलिद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व डॉ. मनोजकुमार मोरे, प्राचार्य डॉ. फारूख मोतीवाला, डॉ. स्वानंद शुक्ला, प्राचार्य वैद्य श्रीकांत देशमुख, वैद्य बाळासाहेब धर्माधिकारी, प्राचार्य डॉ. राजेश्वर तु. उबरहंडे, डॉ. भागवत यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बी. आर. पेंढारकर, आबाजी शिंदे, राजेश इस्ते कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post प्रजासत्ताक दिन-2023 : ‘आरोग्य’चे विद्यार्थी होणार राज्यस्तरीय पथसंचलनात सहभागी appeared first on पुढारी.

Exit mobile version