प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची …

प्रजासत्ताक दिन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खादी ग्रामोद्योग केंद्रात राष्ट्रध्वज खरेदीची लगबग दिसून येत आहे. तर बाजारपेठेतही शाळेत साज-या होणा-या प्रजासत्ताक दिनासाठी चिमुकल्यांची देशसेवा भक्तीपर गाण्यांच्या सादरीकरणासाठी विविध आकर्षक पोशाख घेण्यासाठी गर्दी होत आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत दाखल झालेले विविध आकर्षक पोशाख.

प्रजासत्ताकदिनी देशसेवापर गाण्यांच्या सादरीकरणासाठी तिरंगाला साजेसा पोशाख खरेदी करताना चिमुकलीसह तिचे पालक.

“झेंडा उंचा रहे हमारा…”  जणू असं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ग्वाही देत त्यांचा साधेपणातील रुबाब न्याहाळतांना चिमुकला.  (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो)

The post प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची … appeared first on पुढारी.