प्रमाणपत्र वितरणाचा लॉकडाउन काळात विक्रम; तब्बल 4 लाखांवर दाखले वितरण

नाशिक : लॉकडाउनच्या काळात शाळा- महाविद्यालये बंद असली, तरी शाळाप्रवेशांसह अन्य प्रक्रियांसाठी ऑनलाइन कामकाज मात्र सुरूच होते. त्यात प्रामुख्याने ऑनलाइन दाखल्यांचे वितरण विक्रमी प्रमाणात झाले आहे. 

नऊ महिन्यांत विक्रमी दाखल्याचे वितरण

नऊ महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात तब्बल चार लाखांहून अधिक दाखल्यांचे ऑनलाइन वितरण झाले. आपले सरकार पोर्टल, महा ई-सेवा केंद्र आदींसह विविध मार्गानी ऑनलाइन सेवा दिल्या गेल्या. लॉकडाउनच्या काळात सुरवातीला अनेक दिवस जेमतेम पाच टक्के कर्मचारी नियमित कामकाजात सहभागी असत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कामकाज आणि कर्मचारी संख्याही वाढविण्यात आली. या काळात बहुतांश कामकाज बंद असले तरी, ऑनलाइन दाखल्यांचे कामकाज मात्र सुरू होते. यामुळेच नऊ महिन्यांत विक्रमी दाखल्याचे वितरण झाले. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

एकूण अर्ज : ४ लाख ३२ हजार ३६९ 
मंजूर : ४ लाख १४ हजार ३९४ 
प्रलंबीत : ७ हजार ३५८ 
नामंजूर : २ हजार ७९१ 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

उत्पन्नाचे दाखले : २ लाख ५५ हजार ७६५ 
जातीचे दाखले : ५७ हजार १७४ 
राष्ट्रीयत्व दाखले : ५४ हजार १०० 
नॉन क्रिमिलेयर : ३६ हजार ४७ 
प्रतिज्ञापत्र : ७ हजार १२० 
अधिवास : ९८१ 
भूमिहीन : १७० 
ज्येष्ठ नागरिक : ३८ 
अल्प-भूधारक : २२६ 
तात्पुरता रहिवास : १ हजार १०० 
महिला आरक्षण : २६१ 

प्रमुख शैक्षणिक दाखले 
तालुका राष्ट्रीयत्व जातदाखले उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलेयर 

बागलाण ३७११ ५८०२ १६५३३ २६६४ 
चांदवड १८८४ २५६९ ९०८५ १११६ 
देवळा ११०६ १८०७ ४३७७ १०५२ 
दिंडोरी १२३५ ३६५१ १७०९७ १०७१ 
इगतपुरी ११५३ २०३६ ८२६७ ७३१ 
कळवण १२७३ २७५४ १३४०१ ७२७ 
मालेगाव ९५६१ ७६०९ ४३०२४ ५०७१ 
नांदगाव २७४५ २३५६ ८७९६ १६३० 
नाशिक १७१३७ ११७३० ७२२२८ १३१४० 
निफाड ५४३२ ५३११ २४०७१ ३६८४ 
पेठ ५९४ १२४७ ३७९९ २७ 
सिन्नर ३७५१ ३०३५ १३७३३ ३११४ 
सुरगाणा ११९५ २२७५ ४३६० २२ 
त्र्यंबकेश्वर ९७० १७०७ ७५०३ १०४ 
येवला २०२६ २८९३ ९४९१ १५३५