प्रवाशांसाठी खुशखबर! रद्द तिकिटांसाठी रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

नाशिक रोड : रेल्वे मंत्रालयाकडून २१ मार्च २००२ ते ३१ जून २०२० या कालावधीसाठी आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळविण्यासाठीच्या कालमर्यादेत वाढ केली असून, रेल्वेच्या नियमित वेळापत्रकातील रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांसंदर्भातच हे लागू करण्यात आले आहे. 

अशी केली मुदतवाढ

आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळविण्यासाठी घातलेली कालमर्यादा प्रवासाच्या दिवसापासून सहा महिने होती. ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आरक्षित तिकीट १३९ मधून वा आयआरसीटीसी संकेतस्थळावरून रद्द केले गेले असेल तर असे तिकीट प्रवासाच्या दिनांका तारखेपासून नऊ महिन्यांत आरक्षण खिडकीवर परत करता येईल. प्रवासाच्या दिवसापासून सहा महिने उलटून गेल्यामुळे, अनेक प्रवाशांनी आपली मूळ तिकिटे विभागीय रेल्वेच्या दावा कार्यालयात साध्या अर्जासहित जमा केली असतील, प्रवाशांना अशा पीआरएस काउंटर तिकिटांचा परतावा देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप