प्रवाशांसोबत कसे वागणार? नाशिकमध्ये सिटीलिंकच्या बस चालकांना ‘प्रशिक्षण’

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिटीलिंक व प्रवाशांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षितरित्या व सुखकर प्रवास करता यावा यासाठी सिटीलिंकने खास चालक व वाहकांसाठी प्रत्येक रविवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटीलिंक, पोलिस प्रशासन व नाशिक फस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा रविवारी (दि.१३) पहिला दिवस पार पडला.

त्र्यंबकरोडवरील सिटीलिंक मुख्यालयात दोन सत्रांत हे मार्गदर्शन शिबीर पार पडले. पहिल्या सत्रात मोटिव्हेशनल ट्रेनर व द आर्ट आॅफ सक्सेसचे संचालक अभय बाग यांनी उपस्थित चालकांना ट्राफिक अवेअरनेस व पर्सनालिटी डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये बस चालविताना चालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, चालकांची प्रवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांप्रती असलेली जबाबदारी, प्रवाशांसोबत असलेले सकारात्मक वर्तन, प्रवाशांसोबत संभाषण करतांना मनावर संयम ठेवण्याबरोबरच आपली बस स्वच्छ ठेवणे, फेरी सुरू करण्यापूर्वी बसची यांत्रिक तपासणी करणे, अशा अनेक मुद्द्यांवर चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

दुस-या सत्रात वाहतूक शाखा युनिट-२ चे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब शेळके यांनी चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी शेळके यांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगताना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आर टी ओ नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येक चालकाची जबाबदारी असल्याचे शेळके यांनी संगितले.

हेही वाचा :

The post प्रवाशांसोबत कसे वागणार? नाशिकमध्ये सिटीलिंकच्या बस चालकांना 'प्रशिक्षण' appeared first on पुढारी.