प्रा. कानेटकर हिमालय, आम्ही त्यांची सावली – भरत जाधव

नाशिक : ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकात संवादाची गंमत होती. प्रा. वसंत कानेटकर यांचे नाटकाचे प्रयोग हिमालयासारखे होते आणि आम्ही त्यांची सावली असल्याचे प्रतिपादन अभिनेता भरत जाधवने केले. महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. २०) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभावेळी अभिनेते भरत जाधव आणि कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

अभिनेता भरत जाधव म्हणाला, की प्रा. वसंत कानेटकर यांची नाटक दर्जेदार होती. आज तो दर्जेदारपणा कमी झाला असून, उत्तम नाटक लेखकांची आज कमी आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकाची श्रीमंती नाशिककरांना लाभली आहे. त्यांच्या लेखणीत संवादाची गंमत होती. ती आजच्या नाटकांच्या संवादात झिरपत नाही. अंजली कानेटकर म्हणाल्या, की प्रा. वसंत कानेटकर यांच्या साहित्यासाठी टीव्ही मालिकांमधून मागणी वाढली आहे. प्रा. कानेटकर यांचे साहित्य त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानेही चिरतरुण आहे. परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तेजस बिलदीकर यांच्या दिग्दर्शनाखाली केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील प्रसंगांचे अभिवाचन केले. परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, विजय शिंगणे, राजेश भुसारे, विनोद राठोड, पीयूष नाशिककर, चंद्रकांत जाडकर, मोहिनी भगरे, प्रिया सुरते, स्वप्नील तोरणे, प्रतीक शर्मा, आदिती मोरणकार, विशाल जातेगावकर, सुनील परदेशी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

वर्षभर कार्यक्रम करणार 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २० मार्च २०२१ ते २० मार्च २०२२ या कालावधीत दर महिन्यातून एकदा प्रा. वसंत कानेटकर यांच्या नावे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती