प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील ‘त्या’ तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल

Nashik Breaking : प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेरच्या तरूणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गोरख बच्छाव असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीनेच आपल्या कुटुंबियाच्या मदतीनं तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवलं होतं. या घटनेत संबंधित तरूण 55 टक्के भाजला होता.

गोरखवर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाने गोरखला मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात पोलिसांनी मुलीसह आई वडील आणि दोन भाऊ यांना अटक केली आहे.  देवळा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाची तीन वर्षांपूर्वी एका मुलीशी ओळख झाली होती. दरम्यान, त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या लग्नास दोघांच्या नातेवाईकांनी विरोध दर्शवला. यातून वाद सुरु झाला. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचे दुसऱ्यासोबत लग्नही ठरले होते. मात्र त्यास गोरख हा अडथळा आणत होता अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, गोरख हा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लोहणेर वासोळ रोडवर उभा असतांनाच मुलीसह मुलीचे वडील, आई आणि दोन भाऊ त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी गोरखला लोखंडी रॉड आणि काठीनं मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या बचावासाठी गोरख एका मोबाईलच्या दुकानात घुसला. त्यानंतर मुलीनं त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं होतं. या घटनेत गोरख 55 टक्के भाजला होता. यावेळी बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

हे देखील वाचा-

Nagpur Crime : नागपूर हादरलं! 65 वर्षीय वृद्धेवर बलात्काराची घटना उघडकीस

Nagpur Crime : धक्कादायक! सोशल मीडियावरील ओळख महागात, नागपुरात तरुणीवर सामूहिक अत्याचार

Nagpur Crime : धक्कादायक! सोशल मीडियावरील ओळख महागात, नागपुरात तरुणीवर सामूहिक अत्याचार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha