जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव या ठिकाणी पत्नी वंदना पवार हिने प्रेम संबंधांमध्ये अडचण ठरलेल्या पती याचा ब्लेडने वार करून डोक्यात दगड टाकून त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीला व चुलत दिराला अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस सत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील न्यायडोंगरी येथे गवळीवाडा राहणाऱ्या बाळू सिताराम पवार व पत्नी वंदना पवार यांच्या सोबत राहत होता. पती बाळू पवार हा वंदनास दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करीत होता. या त्रासाला पत्नी कंटाळून गेली होती. तिचे चुलत दिर गजानन राजेंद्र पवार यांच्या सोबत गेल्या दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधांमध्ये पती बाळू पवार हा अडथळा ठरत होता.
प्रियकर व प्रेयसीने असा रचला कट
प्रेमामध्ये अडचण ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी वंदना व प्रियकर चुलत दीर गजानन यांच्यासोबत पतीला मारण्याचा कट रचण्यात आला. मंगळवार (दि.१८) रोजी चाळीसगाव येथे पती बाळू याला घेऊन आले असता. बाळूला चुलत दिर गजानन याने दारू पाजली व सायंकाळी माहेरी जात असल्याचे सांगून कन्नड येथे जायचे असे सांगितले. बाळू याला गजानन यांच्या दुचाकीवर कोदगाव शिवारात नेले. त्यानंतर त्या ठिकाणी पत्नी वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले व डोक्यात दगड टाकून पती बाळू याला ठार मारले. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून बाळू पवार याचा मृतदेह महामार्गावर नेऊन टाकून दिला. त्याच्या खिशात आधार कार्ड ठेवले व प्रियकर व प्रेयसी दोघे तिथून प्रसार झाले.
असा लागला शोध…
याप्रकरणी मंगळवार (दि.१८) रोजी रात्री अकरा वाजता पोलिसांना तुषार अनिल देसले (राहणार कोदगाव तालुका चाळीसगाव) यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी मयत बाळू पवार यांच्या अंगावरील खुणांमुळे संशय आल्याने तपास सुरु केला. आधारकार्डच्या आधारे नातेवाईकांकडे विचारपूस केली असता पत्नी वंदना तिच्याकडे फोनवर चौकशी केली असता संशय वाढला. दोघा आरोपींना चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरातून बुधवारी (दि.१९) रोजी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून याप्रकरणी सहय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा: