प्रेम, लग्न आणि धोका! लग्नाच्या सत्यनारायण पूजेनंतर नवरी उडाली भुर्रर्र..

नांदगाव (जि.नाशिक) : लग्नसोहळा रात्री झाला. दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी सासरी गेली. सत्यनारायणपूजा झाल्यावर त्याच रात्री एका कारमध्ये बसून ती निघून गेली. त्यानंतर नवऱ्या मुलाने अनेकदा फोन केले मात्र ती आलीच नाही. या घटनेने नवरा मुलगा आणि सासरच्यांना धक्का बसला आहे. असे नेमके काय घ़डले...?

सत्यनारायण पूजेनंतर नवरी उडाली भुर्रर्र
वडकीनाला येथे हातगाडीवर वडापावची विक्री करणाऱ्या नीलेश दरेकर याने नांदगावला राहणारे मामा व त्यांच्या मुलामार्फत लग्न जमत नाही म्हणून प्रयत्न सुरू केले होते. मामेभावाच्या मनमाड येथे राहणाऱ्या मित्राने मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील भवानीबाबा हे लग्न जमवतात, असे सुचविले. त्यानुसार भवानीबाबाच्या संपर्कात ते आले. येथूनच लग्न जमविण्याची कहाणी सुरू झाली. चांगली मुलगी दाखवितो, मात्र त्यासाठी ५० हजार रुपये लागतील, असे भवानीबाबाने सांगितले. तीन मुलींची छायाचित्रे मोबाईलवर पाठविली. त्यातील एक मुलगी नीलेशला पसंत पडली. ती नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एकरुखे येथील होती. मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाला. त्यासाठी मुलीच्या आईला तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे भवानीबाबाने सांगितले. कोपरगावला कोर्ट बंद असल्याने त्याच दिवशी सर्व नांदगावजवळील मामाच्या गंगाधरी येथील शेतात आले. लग्नसोहळा रात्री झाला. दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी पुण्याला गेली. सत्यनारायणपूजा झाल्यावर मध्यरात्री तिच्या आईची तब्येत बिघडली, असे सांगून एका कारमध्ये बसून ती निघून गेली. त्यानंतर नवऱ्या मुलाने अनेकदा फोन केले मात्र ती आलीच नाही.  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल; पुण्यातील वराची फसवणूक 

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेनंतर वधू तीन लाख ९९ हजारांचा ऐवज घेऊन परागंदा झाल्याची घटना नांदगावजवळील गंगाधरी शिवारात घडली. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकीनाला येथील वडापाव विक्रेता नीलेश दरेकर (वय ३४) याने विवाह जमवून फसवणूक करणाऱ्या टोळीत नगरच्या दोन महिलांसह मालेगाव-रावळगाव येथील एकूण चौघांचा समावेश असल्याची तक्रार दाखल केली. फिर्यादीनुसार वधूसह एकूण सात जणांविरोधात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

लग्नानंतर दोन दिवसांतच वधू चार लाखांचा ऐवज घेऊन परागंदा 
संतोष उगलमुगले (मालेगाव), योगेश वाघ (रावळगाव), बालाजी आहेर, विजय चव्हाण (रावळगाव), पूजा शिंदे (रा. एकरुखे, ता. राहता, नगर), मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शीतल मोरे अशी संशयितांची नावे आहेत. 
गंगाधरी येथे २४ जून २०२० ला ही घटना घडली होती. लग्नात पूजा शिंदे हिला तीन लाख रुपये रोख, ९० हजारांचे सोन्याचे व नऊ हजार १०० रुपयांचे चांदीचे दागिने नीलेशने घातले होते.