ओझर पुढारी वृत्तसेवा : एलआयसीने प्लॉट लिलावात काढला असल्याची बतावणी करुन विक्री करण्याच्या बहाण्याने एलआयसी शाखा मॅनेजरसह दोघांनी एका महिलेकडून ८ लाख १६ हजार रुपये घेतले परंतु त्या बदल्यात प्लॉट महिलेच्या नावावर केला नाही आणि रक्कमही परत न करता फसवणूक केली. प्लॉट व रकमेबद्दल विचारना केल्यानंतर दोघांनी महिलेस धमकी दिली.
ओझर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक २ जानेवारी २०२४ ते दिनांक १३ जुन पर्यंत श्रीमती माने राहाणार फ्लॅाट नं 06 व 07 सिध्दीविनायक इंडस्ट्रिअल ईस्टेट ओझर ता.निफाड यांचे घरी उल्हास पंडीत राहाणार इदिंरा नगर नाशिक व महेंंद्र जोशी एल आय सी शाखा मॅनेजर राहणार गडकरी चौक नाशिक या दोघांनी संगनमत करुन अनिल गोविंद कुलकर्णी, रा. जानोरी रोडवरील प्लॉट नं. 25, गट नं. 2511, अमृत नगर मागे, जानोरी रोड, मुंबई आग्रा रोड, ओझर शिवार, ता. निफाड, जि. नाशिक. यांचे मालकीच्या प्लॉटवर ‘बाणगंगा पतसंस्था, ओझर’ चा बोजा असल्याचे माहित असताना सुद्धा हा प्लॉट एल. आय. सी. ने लिलावात काढलेला असल्याचे सांगुन सदरचा प्लॉट लिलावात विक्री करण्याच्या बहाण्याने संगनमत करून श्रीमती माने यांंचे कडुन 08, 16,000 (आठ लाख सोळा हजार) घेवून ही तो प्लॉट नावावर केला नाही आणि श्रीमती माने यांची रक्कमही परत केली नाही त्यांची फसवणुक केली असून श्रीमती माने यांनी पंडीत व जोशी यांना त्याबाबत विचारणा केली असता, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली असल्याची तक्रार श्रीमती माने यांनी ओझर पोलिस ठाण्यात नोंदविल्यावरुन ओझर पोलिसांनी पंडीत व जोशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ओझर पोलीस करीत आहे.
हेही वाचा –