फक्त अठरा दिवसांचा कोविडयोद्धा विजयी! बाळाला डॉक्टरांनी दिले पुनरुज्जीवन

नाशिक : येथे नुकतेच अतिशय गंभीर परिस्थितीत एक नवजात अर्भक दाखल झाले, या बाळाला घरातील इतर सगळे सदस्य बाधित झाल्याने संसर्ग झाला होता. या बाळाला पुनरुज्जीवन देण्यासाठी एका सक्षम आणि परिपूर्ण हॉस्पिटलची गरज होती. ती गरज, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या टीमने लीलया पेलली. 

फक्त अठरा दिवसांचा कोविडयोद्धा विजयी! 
बाळ ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, त्या वेळी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयाची गती अनियमित होती. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने किडनीला सूज आली होती, रक्त गोठण्याची प्रक्रिया दोषपूर्ण झाली होती आणि ‘एचआरसीटी’चा स्कोर नऊपासून चौदापर्यंत पोचला होता, अशा बिकट परिस्थितीत डॉक्टर सुशील पारख, बालरोगतज्ज्ञ आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर यांनी बाळावर उपचार करण्यास सुरवात केली. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

आधुनिक तंत्रज्ञान, जगविख्यात सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे अनुभव आणि उपचारपद्धती याच्या जोरावर या बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांच्या चमूला यश मिळाले. यात डॉ. सुशील पारख, डॉ. सचिन पाटील, डॉ. नेहा मुखी, डॉ. पूजा चाफळकर, नर्सिंग टीम यांचा समावेश होता. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

उत्तर महाराष्ट्रातील कित्येक लहान मुले सध्या कोविड संक्रमित होत आहेत आणि त्यांच्यावर यशस्वीरीत्या उपचार करून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल लहान मुलांसाठी सर्वोत्तम हॉस्पिटल असल्याचे सिद्ध करत आहे. 
-डॉ. सुशील पारख