फटाके फोडताना नाशिकमध्ये पाच वर्षाचा मुलगा भाजला

फटाक्यांमुळे मुलगा भाजला,www.pudhari..news

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- उत्तमनगर परिसरातील शुभम पार्क येथील इमारतीत शुक्रवारी दुपारी अर्धवट फुटलेले फटाके जमा करून त्यातील दारु एकत्रित करून पेटवताना फटाके फुटुन पाच वर्षाचा मुलगा भाजला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विकास परिहार असे भाजलेल्या मुलाचे नाव असून तो उत्तमनगर परिसरातील शुभम पार्क येथील इमारतीत बिल्डिंग नंबर ५ मध्ये असलेल्या नेपाळी वाचमनचा मुलगा आहे. विकास याने शुक्रवारी दुपारी परिसरात अर्धवट फुटलेले फटाके जमा करून पेटवताना फुटल्याने यात विकास हा २५ टक्के पेक्षा जास्त भाजला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस शिपाई निकम करीत आहेत.

विकास हा फटाक्यांमुळे भाजला आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून भाजल्यामुळे परिसरात सर्वांना दुःख वाटत आहे. तसेच या पेशंटला भेटण्यासाठी शासकीय हॉस्पिटल येथे मी गेले असता येथे फटाक्यांमुळे भाजलेले हा आठवा पेशंट आहे असे सांगण्यात आले. यामुळे फटाके हे किती घातक आहे याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे.
वंदना पाटील, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा :

The post फटाके फोडताना नाशिकमध्ये पाच वर्षाचा मुलगा भाजला appeared first on पुढारी.