फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळेच व्यावसायिकाने घेतला अखेरचा निर्णय; परिसरात हळहळ

सातपूर (नाशिक) : आधीच लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यात वारंवार फायनान्स वसुलीच्या तगादा येत होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे अखेर त्यांनी घेतला निर्णय. पहाटेच्या घटनेने परिसरात हळहळ...वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

भाईगिरीच्या प्रकारातून सातपूरला एका व्यावसायिकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. लॉकडाउननंतर सरकार घराचे व उद्योगधंद्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाने हैराण झालेल्या दुकानदाराने आत्महत्या केली. योगेश ऊर्फ राजू हनुमंत जाधव (वय ४२, सातपूर कॉलनी, श्रीकृष्णनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. जाधव यांचे आनंदछाया परिसरात मोबाईलचे दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. २७) पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मृत जाधव यांना खासगी फायनान्स कंपनीचे लोक वारंवार दूरध्वनी करून वसुलीसाठी धमकी देत असत, अशी प्राथमिक माहिती नातेवाइकांनी दिली.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

म्हणून केली आत्महत्या?

जाधव याने प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. वसुली न करता माणुसकीने व्यवहार करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही अनेक खासगी फायनान्स कंपन्या रिकव्हरी करताना दादागिरी करीत असल्याने अशा फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन केली.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार