फेब्रुवारीपर्यंत मनपा कर्मचाऱ्यांना पदोन्नती; सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश 

नाशिक : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पदोन्नती तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या. 

सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश 
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच आठ वर्षांपासून पदोन्नती मिळत नसल्याने प्रश्‍न मार्गी लावण्याच्या उद्देशाने स्थायी समितीच्या सभेत विषय चर्चेला आणला. नगरसेवक राहुल दिवे, कल्पना पांडे आदींनी प्रशासनाला जाब विचारला. सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात वेतननिश्चिती समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिफारस केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बैठका

एकीकडे वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू असताना, दुसरीकडे मात्र आठ वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, बैठकांमधून फलित बाहेर पडत नसल्याने प्रशासनाला १५ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. दहा फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी व १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल