‘फेव्हिपिरवीर’ औषधौपचाराने कोरोना लवकर नष्ट? तिसऱ्या चाचणीच्या निरीक्षणात स्पष्ट 

नाशिक : फेव्हिपिरवीर हे कोरोना रुग्णांनी तोंडावाटे घेण्याचे विषाणूच्या पुनर्निर्मितीला रोखणाऱ्या औषधाच्या उपचाराने सौम्य ते मध्यम कोविडने ग्रस्त रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केलेल्या तिसऱ्या टप्प्याच्या रँडमाइज्ड चाचणीत ही निरीक्षणे नोंदली गेली असून, अमेरिकेतील इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसिजेस (आयजेआयडी) मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. 

‘फेव्हिपिरवीर’ औषधाने कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होण्याचा कालावधी अल्प 

फेव्हिपिरवीर (उत्पादनाचे नाव फॅबिफ्ल्यू) ची तिसऱ्या टप्प्याची चाचणी रँडमाइज्ड पद्धतीने देशभरातून निवडलेल्या १५० रुग्णांवर घेण्यात आली. कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यापासून ४८ तासांत फेव्हिपीरवीरची परिणामकारकता, सुरक्षितता, सर्वसाधारण शुश्रूषा मिळालेल्या आणि फक्त सर्वसाधारण शुश्रूषा मिळालेल्या सौम्य ते मध्यम कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीतील बदलाचे निरीक्षण नोंदणे हे या चाचणीचे उद्दिष्ट होते. ‘फेव्हिपिरवीर’चे उपचार मिळालेले रुग्ण बरे होण्याचा काळ कमी होता आणि त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज कमी प्रमाणात लागणे असे इतरही फायदे झाल्याचे या चाचणीत दिसून आले. शिवाय, ‘फेव्हिपीरवीर’चा उपचार केलेल्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा लवकर घरी पाठविण्यात आले. 

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

फेव्हिपीरवीरमुळे संसर्ग लवकर नष्ट 
मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. झरीर उदवाडिया म्हणाले, की कोविडवरच्या कोणत्याही औषधाची परिणामकारकता रुग्णालयात घेतलेल्या चाचण्यांच्या निरीक्षणांवरून सिद्ध झाली पाहिजे. त्यांनी १५० रुग्णांवर ती चाचणी सुनियोजित केली होती आणि त्यातून असे दिसून आले, की फेव्हिपीरवीरमुळे संसर्ग लवकर नष्ट झाला आणि रुग्ण बरा होऊन घरी जाण्याचा काळ लक्षणीयरीत्या कमी झाला. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

जीवनमानाची पातळी सुधारण्याचा प्रयत्न
कोरोनाची जगभरात प्रचंड प्रमाणात लागण होत असताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केलेली ही चाचणी म्हणजे कंपनीचा सर्व रुग्णांना परवडेल, असे औषध उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनमानाची पातळी सुधारण्याचा प्रयत्न होता याची पावती होती, असे ग्लेनमार्कच्या ग्लोबल स्पेशालिटी ब्रॅन्ड पोर्टफोलिओच्या प्रमुख मोनिका टंडन यांनी सांगितले.