नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- टाकळी रोड येथे फ्लॅट विक्रीच्या कारणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात वरवंटा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आकाश चंद्रकांत जाधव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंटमधील रहिवासी असलेले मयंक चंद्रकांत जाधव आणि त्याचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. त्या दोघांचे फ्लॅट विक्रीच्या कारणावरून आपसात भांडणे झाली. सोमवारी (दि. ११) सकाळी 11 वाजता दोन्ही भावांमध्ये भांडणे झाली. आकाशने मयंकच्या डोक्यावर लोखंडी वस्तू व दगडी वरवंटा मारून मयंकची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय पगारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आकाश जाधवला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
- Shiv Sena MLA Disqualification Case : बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची घटना बनवली; पण पालन केले नाही – उलटतपासणीत राहुल शेवाळेंचा दावा
- दहशतवादाचे नवे रूप
The post फ्लॅट विक्रीवरुन वाद, डोक्यात वरवंटा टाकून मोठ्या भावाचा खून appeared first on पुढारी.