बँकेतही शिरला कोरोना! स्टेट बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; व्यवहार विस्कळीत

 सिडको (जि.नाशिक) : दिव्या ॲडलॅबजवळील स्टेट बँकेच्या त्रिमूर्ती चौक शाखेत खाते उघडणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या मुळे बँकेतील व्यवहार थंडावले आहेत. बँकेत खाते उघडणे बंद झाल्याने ग्राहकांना हात हलवत पुन्हा घराकडे माघारी फिरावे लागत आहे. 
बँकेतील व्यवहारही विस्कळित झाल्याचे बँकेच्या ग्राहकांना बघायला मिळत आहे. बँकेबाहेर ग्राहकांची रांग लागलेली असते. 

बँकेतील व्यवहार थंडावले
तसेच सर्व्हर डाउनमुळे व्यवहार ठप्प झाल्याचे सोमवारी (ता. २२) दिसून आले. बँकेचे अधिकारी व कर्मचारी मात्र वेळ काढून नेत असल्याचे दिसून आले. इथे कोणीही ग्राहकांना व्यवस्थित माहिती देताना दिसून आले नाही. त्यामुळे ग्राहकांचे रोजचे व्यवहार ठप्प झाल्याने त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. केवळ तीन व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्याने जर पूर्ण व्यवस्था विस्कळित होत असेल, तर मग बँकेचे पूर्वनियोजन नसावे का, असाही सवाल ग्राहक उपस्थित करताना दिसले. त्यामुळे बँक प्रशासनाला अशाप्रकारे निमित्तच भेटले असून, ते वेळकाढूपणा करत आहेत, अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळाल्या.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 

बहुतांश ग्राहक आता ऑनलाइन व्यवहार करतात. मात्र, काहींना प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करणे आवश्यक असते. असे असतानाही येथील कर्मचारी व अधिकारी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करीत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ