बंद दाराच्या आड वाढदिवसाची परवानगी हॉटेलचालकाला अंगाशी! ‘आमदनी अठनी, खर्चा रुपया’ परिस्थिती

नाशिक : हॉटेलमध्ये मोठ्या धूमधडाक्यात कार्यक्रम सुरू होता. पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ यांच्या पथकास हॉटेलच्या खिडकीतून प्रकाश दिसला. त्यांनी खात्री केली असता, हॉटेलमध्ये वाढदिवस सुरू असल्याचे समजले. आणि मग....
 

बंद दाराच्या आड वाढदिवसाची परवानगी हॉटेलमालकाला अंगाशी!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने अनेक नियम लागू केले आहेत. सोशल डिस्टन्स राखणे त्यातील एक प्रमुख नियम आहे. त्याचप्रमाणे गर्दी होईल, असे कुठले कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशा सूचनाही दिली आहे. तरीही काही हॉटेलचालकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. असाच प्रकार सोमवारी (ता. २९) रात्री घडला. पुणे रोडकडून तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल गारलिकमध्ये बंद दरवाजाआड वाढदिवस साजरा केला जात होता. सुमारे ९० ते १०० जण त्याठिकाणी उपस्थित होते. मोठ्या धूमधडाक्यात कार्यक्रम सुरू होता. पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ यांच्या पथकास हॉटेलच्या खिडकीतून प्रकाश दिसला. त्यांनी खात्री केली असता, हॉटेलमध्ये वाढदिवस सुरू असल्याचे समजले. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे, तसेच मास्क न लावल्याचे दिसले. पथकाने हॉटेलचालकास दहा हजारांचा दंड केला. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

वाढदिवस दुसऱ्याचा आणि दंड भरावा लागला तो हॉटेलचालकास

वाढदिवस दुसऱ्याचा आणि दंड भरावा लागला तो हॉटेलचालकास. असे कार्यक्रम करण्यास बंदी असताना त्यांनी परवानगी दिली म्हणून त्यांना हा दंड झाला. हॉटेलचालकाने वाढदिवस साजरा करणाऱ्यांकडून जितके रुपये घेतले असतील. तितकी पूर्ण रक्कम किंवा अर्धी रकमेचा दंड भरावा लागला. बंद दाराच्या आड वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देणे हॉटेलचालकाच्या चांगलेच अंगाशी आले. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविल्याप्रकरणी हॉटेलचालकाकडून महापालिकेने दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. ‘आमदनी अठनी, खर्चा रुपया’, अशी परिस्थिती हॉटेलचालकावर ओढावली. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण