बनावट नियुक्तीप्रकरणी पोलिस सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याचा शोधात 

जुने नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्तीपत्र प्रकरणी दोन महिला कर्मचाऱ्यांचे नावे समोर आली होती. भद्रकाली पोलिसांनी जिल्हा परिषदेत सध्या कार्यरत कर्मचारी महिलेस ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तर, सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याचा अद्याप पोलिस शोध घेत आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

याप्रकरणी तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी रवींद्र वाघ, बनावट ओळखपत्र छपाई करणारा अंकुश कर्डिले, अधिकाऱ्यांची सही करणारा संतोष जाधव तसेच, मुख्य संशयित उमेश उदावंत या चौघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत दोन महिला कर्मचाऱ्याचे नावे समोर आली होती. त्यातील एक महिला काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाली आहे. तर, दुसरी महिला सध्या कार्यरत आहे. दोघींनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी (ता.२०) सुनावणी झाली. वऱ्हाडे यानी महिला कर्मचाऱ्याची पोलिस कोठडीची आवश्‍यक असल्याचे न्यायालयास पटवून दिले होते. त्यानंतर त्यांचा अर्ज नामंजूर झाला. पोलिसांची त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरु होती. त्यानुसार सोमवारी (ता.२५) पोलिसांनी दीपांजली देशमुख महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले. या जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. उपचार पूर्ण करून त्या घरी परतल्या होत्या. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

आणखी माहिती समोर येण्याची शक्यता

सेवानिवृत्त महिला कर्मचारी मात्र पोलिसांना मिळून आल्या नाही. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. सोमवारी दीपांजली देशमुख यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत बनावट नियुक्ती प्रकरणी काही एक माहिती नसल्याचे सांगितले. कर्मचारी रवींद्र वाघ यांनी सांगितल्यानुसार ओळखपत्राचे वितरण केले होते. सेवानिवृत्त महिला कर्मचारी अटक झाल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल