बर्ल्ड फ्लूची नाही भिती! चिकनचे दर सरासरी स्थिर; मागणी पुन्हा वाढली

नाशिक : बर्ड फ्लू परतल्याची दीड महिन्यापूर्वी चर्चा पसरली होती. जिवंत कोंबडीसह चिकन दर अतिशय खाली कोसळले होते. ५० ते ५५ रुपये किलोने चिकन विक्री होत होती. परंतु, काही दिवसांपासून बर्ड फ्लूची भीती नाहीशी झाल्याने चिकनचे दर सरासरी स्थिर असल्याचे बाजारात दिसून येत आहे. 

चिकनची मागणी पुन्हा वाढली

चिकनची मागणी पुन्हा वाढली असून, चिकनचे दर सरासरी १०० ते १४० रुपये किलो आहेत. सुरवातीचे दिवस सोडले, तर इतर दिवसांत यापेक्षा दर खाली आले नाही किंवा वाढलेही नाहीत. शहरापासून काही अंतरावर असलेल्या भागात १५० च्यावर दर आहेत. शहर आणि मुख्य बाजारातील दर मात्र सरासरी स्थिर आहेत. नागरिकांसह चिकन विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. बर्ड फ्लूची भीती कमी झाली नसती तर चिकन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असती, अशी प्रतिक्रीया चिकन विक्रेत्यांनी दिली.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

पोल्ट्री व्यवसायात तेजी

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा चिकन आणि अंडी सेवन करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास चिकनच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायात तेजी येऊ शकते.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना