बळीराजाबद्दल कृतज्ञता! भव्य रांगोळी ठरतेय आकर्षण; घंटागाडी कर्मचाऱ्याच्या लेकीचे होतेय कौतुक

नाशिक : पश्चिम विभागातील घंटागाडी कामगार हंसराज कनोजे यांची कन्या आरती कनोजे हिने तिच्या सहका-यांसह मार्केट यार्ड येथे बळीराजाची भव्य रांगोळी काढून चळवळीत नवी सांस्कृतिक परंपरा निर्माण केली.

शहरातील व महाराष्ट्रातीलही ही बळीराजाची पहिलीच रांगोळी

आरतीने मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी मध्ये डिप्लोमा केला असून ती याच क्षेत्रात पुढील शिक्षण घेणार आहे. शहरातील व महाराष्ट्रातीलही ही बळीराजाची पहिलीच रांगोळी असून शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी,मान्यवरांनी व शेतक-यांनी तिच्या कलेचे कौतुक केले. तसेच घंटागाडी कामगारांच्या वतीने आरतीला तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला\

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग