बहीण-भावावर हल्ल्यानंतर पुन्हा तीच घटना! पायात घुसले बिबट्याचे दात

पांढुर्ली (जि.नाशिक) : आठवड्यापूर्वी बहीण-भावावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा झालेल्या या प्रकारामुळे पांढुर्ली शिवारात दहशतीचे वातावरण आहे. 

पांढुर्ली शिवारातील घटना; शेतात दबा धरून बसलेला बिबट्या
पांढुर्ली शिवारातील आगासखिंड रस्त्यावरील एकनाथ वाजे यांच्या घरासमोरून दुचाकीने रात्री साडेदहाच्या सुमारास शेतवस्तीकडे नितीन सुरेश गाढवे व विकास ज्ञानेश्‍वर जाधव जात असताना गव्हाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढविला. बिबट्याने नितीनचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बिबट्याचे दात लागले. याच वेळी पाठीमागे बसलेल्या विकासलाही दात लागले. मात्र, दुचाकी वेगाने पुढे नेल्याने बिबट्याने विकासच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने पंजा पाठीवर लागून जखमा झाल्या. बिबट्याने सुमारे ५० फुटांपर्यंत पाठलाग केल्यानंतर दोघेही पूर्णपणे हादरून गेले होते. मात्र, मोठ्या हिमतीने दोघेही या हल्ल्यातून बचावले. पांढुर्ली आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी विष्णू वाजे, सुरेश गाढवे, धनाजी महाले, विकास वाजे, निळकंठ शिंदे, विलास वाजे या शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

हल्ल्यातून दोघांनी आपले प्राण

रात्रीच्या वेळी शेतवस्तीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून जखमी केले. प्रसंगावधान राखत दुचाकी पुढे वेगाने नेल्याने या हल्ल्यातून दोघांनी आपले प्राण वाचविले.

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना