बागलाण तालुक्यातील रस्त्यांसाठी ३३ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर; आमदार बोरसेंची माहिती

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील रस्ते विकासाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागून दळणवळण सुरळीत होण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ३३ कोटी ५४ लाख रुपये, तर अतिवृष्टीने बाधित झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी २४ लाखांच्या निधीस शासनाने मंजुरी दिल्याची माहिती बांगलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. 

बोरसे म्हणाले, की तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचा यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यापैकी ३३ कोटी ५४ लाखांच्या कामांचा यंदा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सटाणा शहरातून जाणाऱ्या दोधेश्वर रस्त्याचे मजबुतीकरण आणि दुभाजक उभारण्याच्या कामाला चार कोटी ७० लाख रुपये, रातीर-कुपखेडा रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाख, साल्हेर- भिकारसोंडा- पायरपाडा रस्त्यासाठी चार कोटी ५० लाख, काठरे दिगर-डांगसौंदणे- सटाणा रस्त्यासाठी चार कोटी ५० लाख, सटाणा-दोधेश्वर रस्त्यासाठी दोन कोटी, करंजाड-पिंगळवाडे- मुंगसे रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाख, कुपखेडा रस्त्यासाठी दोन कोटी, राष्ट्रीय महामार्ग ते शेवरे- तीन कोटी ८४ लाख, इजमाणे- मळगावसाठी दोन कोटी, पारनेर-निताणे- दोन कोटी, सारदे-अंबासन- चार कोटी ५० लाख इतका निधी मंजूर झाला आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

अतिवृष्टीबाधित रस्त्यांसाठी ७.२४ कोटी 

सोमपूर- भडाणे- पिंपळकोठे रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (पिंपळकोठेजवळील पूल) एक कोटी ३० लाख, सोमपूर- भडाणे- पिंपळकोठे रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (भडाणेजवळील पूल) एक कोटी, नंदुरबार- साक्री-नामपूर- मालेगाव रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी १३ लाख, नंदुरबार- साक्री- नामपूर- मालेगाव रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (वरचे टेंभे वाटोळी नाला) एक कोटी ६० लाख, नंदुरबार- साक्री- नामपूर- मालेगाव रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (काकडगावजवळील फरशी पूल) एक कोटी ३० लाख, नंदुरबार- साक्री- नामपूर-मालेगाव रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (अंबासन फाटा) ६५ लाख, नंदुरबार- साक्री- नामपूर- मालेगाव रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (जिल्हा हद्द ते नामपूर) ४५ लाख, अहवा- ताहाराबाद- नामपूर- लखमापूर रस्ता पूरहानी दुरुस्तीसाठी (सारदे फरशी) ८५ लाख मंजूर करण्यात आल्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड