बागलाण तालुक्यात गारपिटी व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान

नामपूर (जि. नाशिक) :  बागलाण तालुक्यात गुरुवारी ( ता. १८ )  सायंकाळी चार ते पाच  वाजेच्या सुमारास पिंगळवाडे, अंतापूर, ताहाराबाद परिसरात गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे  उन्हाळ कांदा, द्राक्ष, डालिम्ब,गहू आदिसह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपीटीची सर्वाधिक झळ उन्हाळ कांदा पिकाला बसली आहे.