बागलाण तालुक्यात हरभरा ‘तरारून वर’! चांगल्या पावसाचा परिणाम; भरघोस उत्पादन 

अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यात पावसाळ्यातील पर्जन्यवृष्टी पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्याने सर्वत्र पिके हिरवाईने बहरलेली आहेत. हरभरा सरासरी क्षेत्र तीन हजार ९७८ हेक्टर असून, पेरणी सहा हजार ८८० हेक्टरवर करण्यात आली आहे. पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यात जास्त उत्पादन असलेल्या कडधान्य हरभरा घेण्याकडे कल दिसून आला. 

तालुक्यातील बहुतांश ठिकाणी आंतरपीक पद्धतीचे सुधारित आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पिके घेतली जात आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी कमी पाण्यात भरघोस पीक देणारे हरभरा कडधान्यातील पीक पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. तालुक्यात सर्वत्र पिके तरारल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे मजुरांची मागणीही वाढलेली आहे. परिणामी मजूर मिळणे जिकिरीचे झाले आहे. रब्बी हंगामात भरघोस उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
 

हरभरा पीक कमी पाण्यावर भरघोस उत्पादन देते. पश्चिम पट्ट्यात हरभरा पिकाची पेरणी जास्त आहे. कमी कालावधीत पीक येत असल्याने शेतकऱ्यांचा हरभरा लागवड करण्याकडे कल दिसून आला. 
-सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, बागलाण 

कांदारोप वेळेवर मिळाले नाही. त्यामुळेच कमी कालावधीत व कमी पाण्यात हरभरा पीक घेतले. या वर्षी हरभरा पीक जोमात आहे. 
-गोरख बच्छाव, शेतकरी, वीरगाव 

 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

रब्बी हंगाम अंतिम पीकपेरणी अहवाल 

पीक सरासरी क्षेत्र (हेक्टर) पेरणी क्षेत्र (हेक्टर) टक्केवारी 

गहू ७०३५.०० ६११०.०० ८६.८५ 
ज्वारी १३३.०० ११५.०० ८६.४७ 
मका ५४९.०० ६५५.०० ११९.३१ 
इतर तृणधान्ये २.०० ०.०० ०.०० 
एकूण तृणधान्ये ७७१९.०० ६८८०.० ८९.१३ 
हरभरा ३९७८.०० ५९७२.०० १५०.१३ 
इतर कडधान्ये (मसूर) २६.४० २२९.५० ८६९.३२ 
एकूण कडधान्ये ४००४.४० ६२०१.५० १५४.८७ 
एकूण रब्बी हंगाम ११७२३.४० १३०८१.५० १११.५८.