बागलाण पंचायत समिती उपसभापतींचा तडकाफडकी राजीनामा; इच्छुकांच्या हालचाली गतिमान  

सटाणा (जि.नाशिक) : बागलाण पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी सोमवारी (ता. ८) पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अहिरे यांच्या राजीनामा नाट्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या असून पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता
पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने उपसभापतीपदावर इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. वर्षभरापूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग बागलाण पंचायत समितीत राबविला गेला होता. सेना, काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत शिवसेनेच्या कान्हू अहिरे यांची उपसभापतिपदी वर्णी लागली होती. आवर्तननुसार अहिरे यांनी राजीनामा द्यावा असा दबाव वाढल्याने श्री. अहिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केला. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे उपसभापतिसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

सध्या भाजपचे अशोक अहिरे, रामदास सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडी धर्म पाळण्याऐवजी भाजप आणि सेना एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे अतुल अहिरे, ज्योती अहिरे हे उपसभापतिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून, ऐनवेळी काँग्रेसचे रामदास सूर्यवंशी आणि सेनेचे अशोक अहिरे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच