बापाने आपल्याच मुलीचा ओढणीने गळा दाबून केला खून, नाशिकच्या चुंचाळे परिसरातील घटना

गळा आवळून खून,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड लिंक रोड चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात जन्मदात्या बापाने ओढणीने गळा दाबून आपल्या मुलीचा खून केला आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत पोलिसांनी माहिती दिली की, अंबड लिंक रोड चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात रामकिशोर भारती (४५ ) याने आपल्या राहत्या घरी मुलगी ज्योती (२४) हिचा ओढणीने गळा दाबून खून केला.

घटनेची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना समजली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख  यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित रामकिशोर भारती याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : 

The post बापाने आपल्याच मुलीचा ओढणीने गळा दाबून केला खून, नाशिकच्या चुंचाळे परिसरातील घटना appeared first on पुढारी.