बाप रे! जिल्ह्यातील निम्मे अपघाती मृत्यू ‘या’ तीन तालुक्यांत; रस्ते नव्हे मृत्यूचे सापळेच

नाशिक : जिल्ह्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी ५० टक्के मृत्यू मालेगाव, सिन्नर आणि सटाणा या तीन तालुक्यांत होतात. विशेष म्हणजे सलग पाच वर्षांपासून अपघात व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न होऊनही ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. 

गेल्या वर्षातील आकडेवारीनंतरचे चित्र

देशात पाच वर्षांत रस्ते अपघात व मृत्यूच्या प्रमाणात १५ टक्के घट झाली. मात्र, ग्रामीण भागातील रस्ते अपघातील मृत्यूचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे. २०१५ मध्ये वाढत्या अपघाती मृत्यूंची दखल घेत २०२० पर्यंत अपघातांच्या संख्येत घट आणून अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी नियोजन झाले होते. त्यानुसार सुरू असलेल्या पाच वर्षांतील प्रयत्नाअंती अपघात कमी करण्यात जिल्हा यंत्रणेला निश्चितच यश आले. मात्र, ग्रामीण भागातील अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी अजूनही मोठे काम करण्याची गरज असल्याचे गेल्या वर्षातील आकडेवारीनंतरचे चित्र आहे. 

शहरात यश 

पाच वर्षांपूवी शहरी भागात एक हजार ६११ वार्षिक अपघातांची संख्या कमी होऊन एक हजार १५३ झाली, तर मृत्यूंची संख्या ९६० वरून ९३५ झाली. शहरी भागात अपघातांचे प्रमाण कमी होत असले, तरी मालेगाव आणि लगतच्या तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र अपघाती मृत्यूंची संख्या १२ टक्के वाढली आहे. 

ग्रामीणला १२ टक्के मृत्यू वाढले 

शहर-जिल्ह्यात २०१५ मध्ये तीन हजार ६६० अपघातांची नोंद झाली. त्यात २३४ जण मृत्युमुखी पडले, तर ही संख्या घटून एक हजार ६११ पर्यंत घटून मृत्यूंची संख्या १३४ पर्यंत घटली आहे. ग्रामीण भागात पाच वर्षांपूर्वी दोन हजार ४० अपघातांची संख्या होती. एक हजार २३९ इतकी घटली, पण अपघातातील मृत्यूचे प्रमाण मात्र ७९० वरून ८९० इतके वाढले आहे. सरासरी अपघातातील मृत्यूची वाढ १२ टक्के आहे. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

तालुके अपघाती मृत्यूची टक्केवारी 

मालेगाव- १७ टक्के 
सिन्नर- १४ टक्के 
सटाणा- नऊ टक्के  

हेही वाचा >  पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना