नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीचे आवेदनपत्रे ऑनलाइन स्वरूपात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढविली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २८ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय
विषय निवडीच्या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी (ता. १८) शासन निर्णय पारीत केला होता. या पार्श्वभुमिवर अद्यापपर्यंत अर्ज दाखल न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी. तसेच अन्य विद्यार्थ्यांनाही वेळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुदतवाढ देण्यात आली आहे. सुरवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ४ जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. यानंतर या मुदतीत वाढ करत १८ जानेवारीपर्यंत संधी देण्यात आली. ही मुदतदेखील संपलेली असतांना दुसऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसमधून दाखल करायची आहे.
हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना
शुल्क भरण्यासाठीची ही मुदत
व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुर्नपरिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचीदेखील मुदतवाढ दिलेली आहे. येत्या २८ जानेवारीपर्यंत नियमित शुल्कासह आवेदपत्रे दाखल करता येणार आहे. तर विलंब शुल्कासह २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करून चलनाद्वारे बँकेल शुल्क भरण्यासाठी १९ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान मुदत असणार आहे.
हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क