Site icon

बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत एका प्लांटला नववर्षदिनी स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीतील जखमी व मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले.

या आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून अनेक कामगार बेपत्ता आहे. कंपनी व्यवस्थापनाने या दुर्घटनेत फक्त दोन महिला कामगारांचा मृत्यू व 17 कामगार जखमी झाल्याचे भासवले आहे. मात्र या भयानक आगीत शेकडो कामगारांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिंदे गटाचे जिल्हासहसंपर्कप्रमुख तथा माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख संपत काळे, तालुका संघटक जयराम गव्हाणे, दिगंबर शिरसाठ, तानाजी तोकडे, विश्वास खतेले, ज्ञानेश्वर जमधडे, सुरेश जमधडे, कुंडलिक जमधडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी appeared first on पुढारी.

Exit mobile version