बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे

एकनाथ खडसे,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असे नवीन नाव दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर टीका करताना एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नावाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचा संबंध जोडला आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून, पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवीन नाव दिले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले आहे. यावर बोलताना आमदार खडसे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस होते. पण आता हा योगायोग आहे की बाळासाहेब देवरस यांच्या नावाशी मिळतेजुळते ’बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव शिंदे गटाला मिळाले आहे. यामधून कोणाला कसा अर्थ काढायचा तो त्यांनी काढावा, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

The post बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.