बिबट्याच्या घुसखोरीने नागरिक हैराण; बिबटे लोक वस्तीत तर लोकवस्त्या जंगलात 

घोटी/ नाशिक : कसारा घाट माथ्यापासून तर त्र्यंबकेश्वर, सिन्नर , नाशिक, अकोले तालुक्यांतील डोंगराळ भागास लागून भरगच्च वृक्ष व विविध जलाशयांमुळे नटलेल्या भागात बिबटे स्थिरावले आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध घटनात आतापर्यत पस्तीस बिबटे व त्यांचे बछडे मिळून साठच्या आसपास बिबटे सापडले आहे. बऱ्यापैकी भक्ष्य मिळत असल्याने या परिसरात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

बिबट्यांची संख्या वाढत असून बिबटे जसे मानवी वस्तीत घूसत आहे. तसे जंगलात डोंगर दऱ्या टेकड्या फोडून जंगलात लोकवस्‍ वाढत आहे. लोकांची जंगल जमीनीवर घुसखोरी वाढू लागली आणि जंगली श्‍वापद मानवी वस्त्यात घुसू लागल्याने माणूस बिबट्यतील संर्घष वाढत चालला आहे. 

घुसखोरी दोन्ही बाजूने 
तालुक्यातील पूर्व पट्ट्यात ऊस लागवड वाढत आहे. उसात लपण्यासाठी सुरक्षित व पुरेशी जाग उपलब्ध होत असल्याने जलाशय धरणाजवळील उस शेती हे बिबट्यांसाठी चांगले आश्रयस्थान झाली आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात गेल्या १५ ते २० वर्षात झपाट्याने शहरीकरण सुरु आहे. अनेक डोंगर माथ्यांचे सपाटीकरण होउन लोकवस्‍त्या वसल्या आहे. जंगलात वन भागात  रिसॉर्ट आणि पर्यटनस्थळांच्या नावाने सिमेंटचे जंगल वाढत आहे. लोक पर्यटनाच्या निमित्ताने आधीकाधीक जंगलात घूसत असतांना, दुसरीकडे जंगलातील खाद्य संपत चालल्याने जंगली श्‍वापद जंगल सोडून त्यांची आश्रयस्थान सोडून लोकवस्तीत भक्ष्य शोधू लागल्याने माणूस आणि जंगली श्‍वापद यांच्यातील सिमारेषा पुसट होत चालली आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

स्फोटकांचा वापर 

ऊस तोडणीचा हंगाम सुरु असतांना समृद्धी महामार्गाचे सुरू असलेले रात्रंदिवस कामकाज व त्यातील डोंगर फोडण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटके यांमुळे बिबटे, जंगली श्‍वापद त्यांची आश्रयस्थान सोडून शांत ठिकाणाच्या शोधात जंगला लगतच्या अदिवासी वस्त्यांवर हल्ले चढवू लागले आहेत. जंगल व वन्यजीवांच्या रक्षणासाठी स्वतंत्र वनविभाग असला तरी, त्यांना बिबटे पकडण्याचे पिंजरे लावण्याशिवाय इतर कुठल्या कामात वनविभागाचे आस्तीत्व दिसत नाही. त्यामुळे बिबट्या दिसला पिंजरे लावा. पकडलेले बिबटे सोडून द्या. या शिवाय वनविभागात काही घडतही नाही. असा सगळा मामला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

बिबट्यांची परिसरात झालेली वाढ व उत्पत्ती चांगली आहे. तसे मानवी जीवन अमूल्य आहे. या संर्घषातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी सावध राहणे, रात्र अपरात्री घराबाहेर पडतांना,प्रवास करतांना काळजी घ्यावी. बिबट्याची चाहूल लागताच घराजवळ प्रकाशाची व्यवस्था करावी, गोठयांना दरवाजे लावावेत. बाहेर ओट्यावर झोपू नये. फटाके फोडून घराजवळ लाकडे जळती ठेवावी. 
- रमेश ढोमसे, वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी ( प्रादेशिक )