बिबट्यासोबत फोटोसेशन पडलं महागात; ‘त्या’ सेल्फी बहाद्दरावर अखेर गुन्हा 

निफाड (जि. नाशिक) : फोटो घेण्याच्या नादात बऱ्याचदा लोक स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. असाच काही प्रकार येथील उसतोड कामगाराने केला होता.पठ्ठ्याने चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन केले होते. मात्र या कामगारास असे करणे महागात पडले आहे.  वाचा सविस्तर

वन विभागाकडून गुन्हा दाखल 

याबाबत माहिती अशी, येवला वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निफाड तालुक्यातील कुरुडगाव येथे ऊसतोडणी करणाऱ्या युवकाने उसाच्या फडात सोमवारी (ता. १) ऊसतोडणी करीत असताना चिंचखेडा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील ऊसतोड मजूर प्रकाश लक्ष्मण सोनवणे याला उसाच्या शेतात बछडा आढळून आला. त्यानंतर तरुणाने त्या बछड्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.  सापडलेल्या बछड्यासोबत सेल्फी काढत तो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

सर्वत्र संताप व्यक्त

या प्रकारानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून संशयित आरोपी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला निफाड न्यायालयात हजर केले असता, जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच