बिल न दिल्याने कोरोना रुग्णाला ठेवले डांबून; नाशिकच्या वॉक्हार्ट हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

नाशिक : नाशिक येथील वॉक्हार्ट रुग्णालयातर्फे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णाने स्वत: रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्यासोबत घडलेली आपबिती स्वत: रुग्णाने सांगितली आहे.  

नाशिकच्या वॉक्हार्ट हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार 
जळगाव येथे वास्तव्यास असणारे  उल्हास केशव कोल्हे असे रुग्णाचे नाव आहे. कोल्हे म्हणाले, उपचाराचे बिल दिले नाही म्हणून वॉक्हार्ट रुग्णालयाने तब्बल तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच या कालावधीत त्यांना जेवण दिले जात नव्हते. तसेच त्यांच्यावर औषधोपचारही केले गेले नसल्याचे स्वत: कोल्हे यांनी सांगितले. ही माहिती जेव्हा रुग्णाने फोनवरून मित्र परिवाराला सांगितली तेव्हा त्वरीत हालचाल करत रुग्णाची सुटका करण्यासाठी तसेच कारवाईसाठी महापालिकेचे पथक रुग्णालयात दाखल झाले.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

रुग्णाला एका खोलीमध्ये डांबले

कोरोना संसर्ग झाल्याने कोल्हे नाशिकच्या वॉक्हार्ट रुग्णालयात २५ मार्चला  दाखल करण्यात झाले होते. २५ मार्चला अॅडमिट होताना ५०,००० रुपये रक्कम त्यांनी भरली.  नंतर ७ एप्रिलला रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिले. तसेच उपचाराचे १ लाख ३५ हजार रुपयांचे बिल त्यांच्या हातात ठेवण्यात आले. एवढी रक्कम तातडीने भरणे अशक्य असल्याने त्यांनी एवढी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. पैसे भरण्यास काही सवलत द्यावी अशी मागणी केली. परंतु, रुग्णालाय प्रशासनाकडून बिल तातडीने भरण्याचा तगादा लावण्यात आला आणि रुग्णाला डिस्चार्ज दिले नाही. रुग्णालयाच्या एका खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आल्याचे कोल्हे म्हणाले.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

या प्रकरणाची चौकशी व्हावी
या प्रकरणाची माहिती मिळताच महापालिकेचे पथक रुग्णालयात दाखल झाले. यावेळी याची दखल गांभीर्याने घेत रुग्णाची सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही  रुग्णाच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.