जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; बँकेतून अडीच लाख रूपये काढले अन् रक्कमेची पिशवी ही दुचाकीच्या हॅण्डलला लावली अन् तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला. अज्ञात चोरट्याने नजरचुकवून अडीच लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची खळबळजनक घटना चोपडा शहरातील आंबेडकर चौकात घडली.
चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीपाला घेण्यासाठी आलेले मदन माधवराव पाटील (वय-६२) रा.कुसुंबा ता.चोपडा हे दुचाकीसोबत उभे होते. दरम्यान भाजीपाला घेण्यापूर्वी त्यांनी बँकेतून अडीच लाख रुपयांची रोकड काढलेली होती. त्यांनी काढलेली पैशांची पिशवी ही दुचाकीच्या हँडलला अडकवलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून दुचाकीला हँडलला लावलेली रोकडची पिशवी घेऊन पसार झाला. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर वृद्ध शेतकऱ्याने सर्वत्र शोध घेतला. परंतु या संदर्भात काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात जिल्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस काही हरिश्चंद्र पवार करीत आहे.
The post बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन् appeared first on पुढारी.