बेग गॅंगचा मोक्का खुनातील सराईत नईम पाच वर्षांनंतर जेरबंद 

नाशिक : खून आणि मोक्काच्या कारवाईत गेल्या पाच वर्षांपासून श्रीरामपूर पोलिसांच्या हातावर तुरी देत फरारी असलेल्या नइम मेहमूद सय्यद (वय ३०) या कुख्यात बेग टोळीतील सराईताच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पाच वर्षांपासून एका खुनाच्या गुन्ह्यात फरारी होता. तसेच श्रीरामपूरहून नाशिकला येऊन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सोनसाखळ्या ओरबाडण्याचे प्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नात तो पकडला गेला, हे विशेष. त्याच्याकडून शहर पोलिसांनी नाशिक शहरातील ११ सोनसाखळ्या चोरीच्या घटनातील १५४ ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत कला आहे. 

सोनसाखळ्या चोरीचा ट्रेनर 
नाशिक रोडला चेहेडी शिवारात पंपिंग परिसरात पिठाच्या गिरणीतून रात्री साडेआठला घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याच्या प्रयत्नात दोनपैकी एका दुचाकीवरील चोरटे दुचाकी घसरून पडले होते. महिलेच्या ओरडणे आणि तेथील जागरुक युवकांच्या प्रयत्नातून पोलिसांनी पकडलेल्या दोघा संशयितांच्या चौकशीत नईम मेहमूद सय्यद हा सूत्रधार असल्याची उकल झाली. सोनसाखळी चोरताना दुचाकीवरून पडलेले दोघे तरुण नगरमधील आभियांत्रिकीचे विद्यार्थी असून, ते दोघे नईमच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळ्या चोरीचे प्रशिक्षण घेत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. श्रीरामपूर आणि लोणी पोलिस गेल्या पाच वर्षांपासून मागावर होते. परंतु तो हाती लागत नव्हता. वेगवेगळ्या भागात राहून तो उच्चशिक्षित तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत होता. मौजमजा करण्याच्या बहाण्याने बाहेरगावी घेऊन जात तो त्यांच्याकडून चैनस्नॅचिंग करून घेत होता. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

दहा सोनसाखळी चोरीची उकल 
नईम सय्यद (वय ३०, रा. जुन्या तहसील कचेरीमागे, श्रीरामपूर, जि. नगर) या सराईताकडून शहराल दहा सोनसाखळीच्या गुन्ह्याची उकल झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली. ते म्हणाले, की नाशिक रोडला पकडलेल्या कपिल कृष्णा जेधे व गणेश रामदास बन या दोन संशयितांकडून सराईत नईम सय्यद व ट्रीपल एक्स ऊर्फ रॉकी यांची नावे निष्पन्न झाली. गुन्हे शाखा एकच्या पथकाने त्यांचा पुण्यात तपास सुरू केला असता, माग काढीत श्रीरामपूर येथे पोचले. या ठिकाणी दोन दिवस पाळत ठेवून, तर खेरीस सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी नईम सय्यद यास जेरबंद केले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने दिलेल्या कबुलीप्रमाणे शहरातील दहा सोनसाखळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांच्याकडून सात लाख आठ हजार ४०० रुपयांचे १४५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच चोरीची एक दुचाकी, असा एकूण सात लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, रवींद्र बागूल, रघुनाथ शेगर, कर्मचारी संजय मुळक, आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, फय्याज सय्यद, विशाल काठे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, गणेश वडजे, प्रवीण चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

खून आणि मोक्का 
सराईत नईम हा पाच वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आहे. श्रीरामपूर पोलिस त्याला शोधत होते. म्हसरूळ- तीन, नाशिक रोड- दोन, भद्रकाली- एक, अंबड- एक, उपनगर- एक, देवळाली कॅम्प- एक, पंचवटी- एक, लोणी- एक अशा दहा गुन्ह्यांचा तपास लागला