बेमोसमी पावसाने कांदा उत्पादकांची तारांबळ; जुनी शेमळी परिसरात पिकांचे नुकसान

जुनी शेमळी (जि. नाशिक) : येथील परिसरात रविवारी (ता.११) सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. तर, काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. 

बेमोसमी पावसामुळे कांदा खराब होण्याची भिती

येथील परिसरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेमोसमी पावसामुळे कांदा काढणी सुरु असताना अचानक झालेल्या पावसामुळे मजुरांची धावपळ उडाली. काढणी केलेला कांदा शेतातच भिजला. अन्य शेतकऱ्यांनी ताडपत्रीने कांदा झाकला. बेमोसमी पावसामुळे कांदा खराब होण्याची भिती आहे. भाजीपाला पिकांवरही परिणाम झाला. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. 

अचानक झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतात कांदा काढणीचे काम सुरु असताना शेतकऱ्यांसह मजुरांची धावपळ उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा खराब होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मोठे संकट उभे आहे. 
- राहुल शेलार, शेतकरी, जुनी शेमळी  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा