बोफोर्स माहिती पाठ्यपुस्तकातून वगळली

बोफोर्स माहिती वगळली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इयत्ता नववीच्या इतिहास – नागरिकशास्त्र पुस्तकामध्ये बोफोर्स प्रकरणाची अर्धवट असलेली माहिती संदर्भातील चूक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने पाठ्यपुस्तक महामंडळाच्या निदर्शनास लक्षात आणून दिल्यानंतर महामंडळाने धड्यांमधून बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख काढून टाकला. त्याबद्दल काँग्रेस सेवा दलाने महामंडळाच्या या कृतीचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने 2017-18 मध्ये इयत्ता नववीच्या इतिहास व राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील तत्कालीन बोफोर्स घोटाळा या धड्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अर्धवट व चुकीची माहिती त्यांच्या परिचयामध्ये समाविष्ट केलेली होती. परंतु, अशा प्रकारचा घोटाळा झाला नसून, त्याची कुठेही नोंद नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही पाठ्यपुस्तक महामंडळाने नववीच्या इतिहासात अशा प्रकारचा उल्लेख केला होता. त्याविरोधात नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख रद्द करून खरी माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, अशी मागणी केली होती.

त्यावर पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पाठपुरावा करून त्यामधून बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख काढण्यात आला. त्याबद्दल पाठ्यपुस्तक महामंडळाचे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलातर्फे आभार मानण्यात आले.

हेही वाचा :

The post बोफोर्स माहिती पाठ्यपुस्तकातून वगळली appeared first on पुढारी.