भद्रकाली पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; उपाययोजना करण्याचे वरिष्ठांचे आदेश 

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, दोन दिवसांपूर्वी कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले, तर गुरुवारी (ता.२५) पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण

स्थानिक गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नाना जाधव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यादिवसापासून ते सुटीवर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता.२५) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांचादेखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल येताच त्यांनीही वैद्यकीय सुटी टाकली. त घरी परतले. पहिले कर्मचारी आणि नंतर अधिकारी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसभर याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

उपाययोजना करण्याचे वरिष्ठांचे आदेश

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना करण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यानिमित्त काही दिवसांपासून सोनवणे हॉटेलचालक, मंगल कार्यालय चालक तसेच नागरिकांच्या बैठका घेऊन कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यासाठी बैठक घेऊन जनजागृती करत होते. पोलिस ठाणे हद्दीतही गस्तीवर असतावा नागरिकांशी संपर्क साधत जागृती करत होते. बहुधा त्यातून कुणी त्यांच्या संपर्कात आले असावे. त्यातूनच त्यांनाही लागण झाली असल्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.  

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!