भय इथले संपणार कधी? मालेगावात पुन्हा बेफिकीरी; चिंता वाढली

मालेगाव (जि.नाशिक) : शहरात रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नागरिकांमधील बेफिकीरी वाढत आहे. येथील सटाणा नाका भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तब्बल तीन आठवड्यांनंतर रुग्ण दगावल्याने येथे चिंता व्यक्त केली जात आहे.

सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी (ता.२१) १६ रुग्ण आढळले. सध्या महापालिका भागात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २२३ झाली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे. शहरात सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

नागरिकांमधील बेफिकीरी वाढली

जवळपास ९० टक्के नागरिक विनामास्क फिरत आहेत. दरम्यान, शहरात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र याकडे सर्वच घटकांचे दुर्लक्ष होत आहे. बाजारपेठा, बसस्थानके, सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, लग्नसोहळे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शहरात सात दिवसांत शंभरपेक्षा अधिक रुग्णांची वाढ झाली.

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नागरिकांमधील बेफिकीरी वाढत आहे. येथील सटाणा नाका भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तब्बल तीन आठवड्यांनंतर रुग्ण दगावल्याने येथे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या पन्नासच्या आसपास आली होती. केवळ बेफिकीरी वृत्तीमुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.