भय इथले संपत आहे! नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर 

नाशिक : सप्टेंबरमध्ये हजारांच्या पटीत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता शंभरच्या आत पोचली असून, बुधवारी (ता. २७) कोरोना संसर्गावर मात करणारा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९७. ७२ टक्क्यांवर पोचले, तर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये फक्त ८२ रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोचले आहे. 

बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर 
एप्रिलमध्ये कोविडचा पहिला रुग्ण सापडला. मे ते जूनमध्ये शहरात साधारणतः रोज शंभर ते दीडशेपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. जुलै ते सप्टेंबरदरम्यान कोरोनाने नवा उच्चांक प्रस्थापित केल्याने संपूर्ण शहरच व्हेंटिलेटरवर जाते की काय, अशी भीती व्यक्त होत होती. मेअखेर शहरात २३७ कोरोनाबाधित होते. सप्टेंबरमध्ये कोरोनाने पन्नास हजारांचा टप्पा गाठला. ऑक्टोबरमध्ये मात्र कोरोनावाढीचा वेग मंदावत आलेख खालावला. जानेवारीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या खालावली. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.४४, तर मालेगाव शहरात ९३.४४ टक्के आहे. महापालिकेने कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय, समाजकल्याण, ठक्कर डोम व मेरी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेच्या सहकार्याने ठक्कर डोम येथे कोविड सेंटरची उभारणी केली होती. नवीन बिटको व हुसेन रुग्णालय वगळता सर्व कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
 
बरे होण्याचे प्रमाण वाढले 
महिना प्रमाण (टक्केवारीत) 

जून ४२.६० 
जुलै ७१ 
ऑगस्ट ८४ 
सप्टेंबर ९१.०५ 
डिसेंबर ९५ 
जानेवारी ९७. ७२ 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच