भरदिवसा घरात घुसून महिलेचे लुटले दागिने; २५ ते ३० वयोगटातील चार जण शिरले घरात

नाशिक : दुपारी पती कामावर गेले असताना ललीता मरसाळे लहान मुलांसोबत घरात असताना ही घटना घडली. २५ ते ३० वयोगटातील चार जणांणी त्यांच्या घरात प्रवेश केला. नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

२५ ते ३० वयोगटातील चार जण शिरले घरात

ललीता प्रदीप मरसाळे (रा. पाम स्क्वेअर, आदित्य हॉलजवळ, कैलासनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. मरसाळे दांपत्य ‘पाम स्वेअर’ या सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम पाहतात. सोसायटीतर्फे तळमजल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. गुरुवारी (ता. १८) दुपारी पती कामावर गेले असताना ललीता मरसाळे लहान मुलांसोबत घरात असताना ही घटना घडली. २५ ते ३० वयोगटातील चार जणांणी त्यांच्या घरात प्रवेश केला. या वेळी संशयितांनी मरसाळे व त्यांच्या मुलांना चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने तसेच मोबाईल आणि पर्समधील दहा हजारांची रोकड असा सुमारे ३५ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

परिसरात भीतीचे वातावरण

टोळके पसार होताच महिलेने आरडाओरड केली असता याच इमारतीत संशयितांनी घरफोडी केल्याचे उघड झाले. कुलकर्णी कुटुंबीयांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याचा अंदाज असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

जबरी चोरीसह घरफोडीचा गुन्हा

घरफोडी करून परतलेल्या चोरट्यांनी भरदिवसा त्याच इमारतीतील सुरक्षा रक्षकाच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवत रोकडसह दागिने लांबविल्याची घटना जय मल्हारनगर भागात घडली. या प्रकरणी चार जणांच्या टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीसह घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.