भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

बबलू कुरेशीला अटक

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची?

भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.