भरवस्तीतून तीन तोळ्याची पोत लांबवली; सलग दुसऱ्यांदा चैन ओरबाडण्याची घटना   

लासलगाव (जि.नाशिक) : येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मंदिराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने माजी उपसरपंच संतोष दगडे यांच्या मातोश्री चंद्रकला दगडे यांच्या गळ्यातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत लांबवण्याची घटना भरदिवसा घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

घटनेने परिसरात खळबळ

चंद्रकला दगडे सकाळी साडेदहाच्या सुमारास देवदर्शन घेऊन घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करत असताना श्रीराम मंदिर कुठे आहे, असा पत्ता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी विचारत दगडे यांच्या गळ्यातील सोन्याची ३० ग्रॅमची पोत ओरबाडली. या महिन्यात सलग दुसऱ्यांदा याच भागात चैन ओरडण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

 हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा