भाईंच्या दहशतीचा माज एका क्षणात उतरला! सलाम ठोकणाऱ्यांनीही काढल्या उठाबशा 

नाशिक : संशयितांची या भागात खूप दहशत होती. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीसांनी त्यांना चांगलाच धडा दिला. जे भाई अगोदर सलाम करवून घ्यायचे त्यांना उठाबशा काढण्यास देखील लावण्यात आले

जेव्हा पोलीसांनी काढली उधळून लावली गुंडाची दहशत

सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, कर्मचाऱ्यांकडून सात संशयितांची धिंड काढली. संशयितांच्या कुटुंबीयांतील महिलांना माहिती मिळताच जमा झाले. पोलिसांच्या कृतीचा विरोध करत पोलिसांच्या अंगावर चालून येण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र त्यांना वेळीच आवर घातला. संशयितांची या भागात दहशत होती. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी धिंड काढली. चौकमंडई परिसरात संशयितांना उठाबशा काढण्यासदेखील लावण्यात आले. संशयितांच्या कुटुंबातील महिलांनी या प्रकाराचा विरोध केला. समावेश नसताना काहींचे नाव गोवण्यात आले आहे, असे करणे योग्य नाही, तसेच विरोधी गटातील संशयितांची का धिंड काढण्यात आली नाही, अशा प्रतिक्रिया देत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.  

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

आकाश रंजवे खून प्रकरणातील संशयितांची धिंड 

आकाश रंजवे खूनप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयितांची गुरुवारी (ता. ११) जुने नाशिक परिसरातून धिंड काढली. अभय बेनवाल, पवन टाक, सतीश टाक, आकाश टाक, मनीष डुलगज, निखेलेश्‍वर टाक, शिवम पवार अशा सात संशयितांची वडाळा नाका, संत कबीरनगर, मातंगवाडा, राजवाडा, चौकमंडई भागातून धिंड काढली. संशयितांच्या कुटुंबीयांतील महिलांनी एकत्र येत पोलिसांच्या कृतीचा विरोध केला होता. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. बघ्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती..

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

आकाश रंजवे खूनप्रकरणी मुख्य संशयितास पोलिस कोठडी 
नाशिक :
आकाश रंजवे खूनप्रकरणी मुख्य संशयित विशाल बेनवाल याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. भद्रकाली पोलिसांनी घाटकोपर (मुंबई) येथून त्यास ताब्यात घेतले. तडीपार असताना त्याचा शहरात वावर होता. सोमवारी (ता. ८) द्वारका परिसरात पोलिस खबरी असल्याच्या वादातून आकाश रंजवे याचा खून झाला होता. मुख्य संशयित विशाल बेनवाल फरारी झाला होता. भद्रकाली गुन्हे पथकाकडून त्यास मुंबई घाटकोपर येथून ताब्यात घेतले होते. गुरुवारी (ता. ११) दुपारी त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवार (ता. १५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हरीश पवार अद्याप फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.