भाईगिरी करणाऱ्यांना मिळाला चांगलाच धडा! पोलीसांकडून अक्षरश: धिंड

सातपूर (जि.नाशिक) : परिसरात दहशत माजविण्यासाठी काहीलोकं भाईगिरी करताना दिसतात. पण आता परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी चांगलीच कंबर कसली आहे.

मुसक्या आवळण्यास सुरवात; काढली धिंड

सातपूर परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी संशयितांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय पाटील, शुभम राजगुरू यांची शनिवारी (ता. ६) त्यांच्या घरासह परिसर आणि भाईगिरी करणाऱ्या भागातून धिंड काढण्यात आली. पाटील व राजगुरू यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सातपूर पोलिस प्रयत्न करणार आहेत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी सांगितले.  

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच