भाऊ-वहिनीच्या वादात दिरावर हल्ला; वाद मिटविणे पडले महागात

नाशिक : भाऊ-भावजयीचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दिरावर टोळक्याने हल्ला केल्याचा प्रकार खडकाळीत घडला. सिद्धार्थ तमखाने, अनिकेत सातपुते, नयन केदारे व भारती केदारे (रा. सर्व खडकाळी) अशी हल्ला करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शेखर सोनवणे यांनी तक्रार दाखल केली.

दिराला वाद मिटविणे पडले महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.२१) रात्री खडकाळी भागातील भाऊ-वहिनीचा वाद सुरू असल्याची माहिती सोनवणे यास मिळाल्यामुळे तो त्यांच्या घरी वाद मिटविण्यासाठी गेला असता त्याला संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. अनिकेत सातपुते याने डोक्यात लाकडी दांडा मारून जखमी केल्याचे तरुणाने भद्रकाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता